विष्णू वाघांच्या जाण्याचे काही संदर्भ
‘विष्णू मामा गेला’ हे फोनवर टाईप करताना क्षणातच अनंत युगांचं पोरकेपण नशिबी आल्याची जाणीव झाली. ह्या वाक्यात महत्वाचं आहे ते ‘गेला’ हे क्रियापद. त्याच्यामाझ्या सहवासातले ठळक टप्पे आठवण्याचा प्रयत्न केल्यास तो सतत कुठेतरी ‘गेलेलाच’ असल्याची जाणीव झाली. १९९४ मध्ये तो मगो सोडून काँग्रेसमध्ये गेला. तेव्हा मी तीन वर्षांचा होतो. ते त्याचं चुकलेलं पहिलं पाऊल असं मी लहानाचा मोठा होईपर्यंत ऐकत आलो आहे. तो ज्या दिवशी काँग्रेसमध्ये गेला त्या संध्याकाळी आमच्या घरी एक वादळी बैठक झाली. त्यात विष्णू मामाबरोबर वावरणारे, अगदी आदल्या रात्री व त्या दुपारपर्यंत त्याच्याबरोबर असणारे त्याचे सहकारी उपस्थित होते. तो काँग्रेसमध्ये गेलाच कसा ह्या प्रश्नावर माझे आजोबा विश्वनाथ नाईक ह्यांनी सगळ्यांनाच फैलावर घेतले. त्यातल्या बऱ्याच जणांना तो काँग्रेसमध्ये जाणार असल्याचा काहीच सुगावा नव्हता. (more…)