पुरुषी नजर व स्त्री पुरुष समानता
कौस्तुभ नाईक/KAUSTUBH NAIK
डॉ लॉरा मल्वे ह्या ब्रिटिश प्राध्यापिकेने १९७५ साली ‘व्हिजुअल प्लेजर अँड नॅरेटिव्ह सिनेमा’ नावाचा एक निबंध ‘स्क्रीन’ ह्या नियतकालिकात प्रकाशित केला. ह्या निबंधात डॉ मल्वे ह्यांनी मनोविश्लेषणाचे सिद्धांत वापरून तत्कालीन हॉलिवूड सिनेमात स्त्रियांना चित्रित करण्याच्या प्रचलित पद्धतीवर भाष्य केले. सिनेमा हे माध्यम पुरुष दिग्दर्शकांनी पुरुष कॅमेरामन वापरून पुरुष प्रेक्षकांसाठी निर्माण केलेले असल्याने पडद्याबाहेर पुरुषांची स्त्रियांकडे पाहण्याची नजर त्यात परावर्तित होत असल्याचे मल्वे ह्यांनी सांगितले. त्यामुळे स्त्रियांना नेत्रसुखासाठी न्याहाळण्याचा सुप्त पुरुषी इच्छा पडद्यावर पूर्ण करण्यासाठी चित्रपटात स्त्रियांचा समावेश केला जातो असा शेरा त्यांनी मारला. ह्या सुप्त विलासी इच्छेला त्यांनी ‘मेल गेझ’ (पुरुषी नजर) असे नाव दिले. (more…)