रीफिगरिंग गोवा – गोव्याची मार्क्सवादी मांडणी
By KAUSTUBH SOMNATH NAIK/कौस्तुभ सोमनाथ नाईक
मानव्यशास्त्रांतून गोव्याविषयी जे काही लिहिले आहे त्यात गोव्याच्या इतिहासाची तसेच समाजजीवनातील क्लिष्टता व विरोधाभास ह्या दोन गोष्टी ठळक आढळून येतात. आणि हि मांडणी काहीश्या सोप्या पद्धतीने समजायची असेल तर ज्या संकल्पनांवर हि मांडणी आधारलेली आहे त्यांचाही थोडाफार परिचय करून देणे गरजेचे आहे. गोव्याविषयी, त्याच्या सामाजिक, ऐतिहासिक, राजकीय जीवनाविषयी समजायचं झालं तर कुठलाही एक पुस्तक ठोस सांगता येणार नाही. अनेक मांडणीतून इथले विरोधाभास आणि क्लिष्टता समजून घ्यावी लागते. म्हणूनच ह्या सदराची सुरुवात कुठून करावी हा जरासा अवघड प्रश्न होता. पण त्यातल्या त्यात एक पुस्तक कुठलं असेल तर ते डॉ. रघु त्रिचूर ह्यांचं ‘रीफिगरिंग गोवा’ हे २०१३ साली प्रकाशित झालेलं पुस्तक. अमेरिकेतल्या टेम्पल विद्यापीठात त्यांनी अँथ्रोपॉलॉजी शाखेत पीएचडी मिळवली असून हे पुस्तक त्यांनी लिहिलेल्या पीएचडी प्रबंधातून साकार झालं आहे. ते सद्या सॅक्रमेंटो येथील कॅलिफोर्निया स्टेट विद्यापीठात प्राध्यापक म्हणून रुजू आहेत. (more…)