Tenancy Reforms – Bandodkar’s Unfinished Project

Several decisions of Dayanand ‘Bhausaheb’ Bandodkar continue to impact the lives of Goans. Certainly his unrelenting efforts to democratize education comes to mind. But for me, the crucial policy that Bandodkar inaugurated were the land reforms which, rather unfortunately, remains his unfinished project. Successive governments have either evaded or deferred addressing the pending cases, while mundkars continue to knock on the doors of powers that be, rendering Bandodkar’s dictum ‘land to the tiller, house to the dweller’ a rather distant dream. (more…)

ख्रिस्तपुराण आणि सतराव्या शतकातील भक्तिभावाचा इतिहास

By KAUSTUBH SOMNATH NAIK/कौस्तुभ सोमनाथ नाईक

इतिहासलेखन राजे राजवाडे, युध्द, सन सनावळ्या ह्यांची नोंद करणे ह्यापुरतेच मर्यादित नसून भूतकाळाचा विविधांगी धांडोळा घेण्याचा उत्तरोत्तर प्रयत्न जगभरातील इतिहासकार करत असतात. ह्यातूनच इतिहासाच्या विविध उपशाखा निर्माण होत असतात ज्ञान/संकल्पनांचा इतिहास (इंटलेक्च्युल हिस्ट्री), विज्ञानाचा इतिहास (हिस्ट्री ऑफ सायन्स) अश्या काही इतिहासाच्या विशेष उपशाखा गेल्या काही दशकांत तयार झाल्या आहेत. त्यापैकीच एक म्हणजे हिस्ट्री ऑफ इमोशन्स – भावनांचा इतिहास. मुळात मूलभूत मानवी भावना ह्या वैश्र्विक असतात का नाही आणि असल्या तरी विविध संस्कृतीत त्यांचे काय आयाम असतात, त्या भावना व्यक्त करण्याचे मार्ग कोणते, ऐतिहासिक काळात समाज कश्या तऱ्हेनं भावनिक पातळीवर व्यक्त होत होता ह्याचा आढावा ह्या उपशाखेत घेतला जातो. आजच्या सदरासाठी डॉ अनन्या चक्रवर्ती ह्यांनी हिस्ट्री ऑफ इमोशन्स ह्या उपशाखेतील संकल्पना वापरून लिहिलेल्या ‘बिटवीन भक्ती अँड पिएटा (२०१७)’ ह्या निबंधाविषयी आपण जाणून घेणार आहोत. डॉ अनन्य चक्रवर्ती ह्यांनी शिकागो विद्यापीठातून इतिहासात पीएचडी मिळवली असून त्या सद्या वॉशिंग्टन डीसी येथील जॉर्जटाऊन विद्यापीठात दक्षिण आशियाई इतिहास शिकवतात. त्यांचे गोवा आणि ब्राझील ह्या प्रदेशातील पोर्तुगीज साम्राज्यवादाच्या इतिहासावरचे ‘एम्पायर ऑफ अपोस्टल्स’ हे पुस्तक काही वर्षांपूर्वी प्रकाशित झाले आहे. (more…)

हिंदू कॅथॉलिक एनकॉउंटर्स – गोव्यातल्या संकीर्ण धार्मिक जाणीवेचा शोध

By KAUSTUBH SOMNATH NAIK/कौस्तुभ सोमनाथ नाईक

२०१३ साली तत्कालीन मुख्यमंत्री स्व मनोहर पर्रीकर ह्यांनी एका मुलाखतीत ‘गोव्यातील कॅथॉलिक समाज हा सांस्कृतिकरीत्या हिंदू आहे‘ अश्या स्वरूपाचे काहीसे वादग्रस्त विधान केले होते. आजही अशाप्रकारची विधाने, खासकरून निवडणुकीच्या तोंडावर आपण ऐकत असतो. गोव्यातल्या मुस्लिम समाज इतर मुस्लिम समाजापेक्षा वेगळे आहे असेही म्हटले जाते. अशी विधाने वरवर ठीक वाटत असली तरी ती काही मूलभूत प्रश्न निर्माण करतात. मुळात हिंदू असणे म्हणजे काय, ख्रिश्चन (त्यातही कॅथॉलिक) असणे म्हणजे काय ह्याची व्याख्या कोणती? त्या व्याख्येची ऐतिहासिक प्रक्रिया काय? गोव्यात हिंदू किंवा कॅथॉलिक असण्याची ठळक वैशिष्ट्ये कोणती? ह्यातल्या सीमारेषा अगदीच स्पष्ट आहेत का पुसट आहेत? गोव्यातले कॅथॉलिक जसे सांस्कृतीकरित्या हिंदू भासतात तसेच गोव्यातल्या हिंदूंना सांस्कृतीकरित्या कॅथॉलिक म्हणू शकतो का? अश्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न डॉ. अलेक्झांडर हेन ह्यांनी आपल्या ‘हिंदू कॅथॉलिक एन्काऊंटर’ ह्या पुस्तकात केला आहे. जर्मनीतील हायडेलबर्ग विद्यापीठात रिलिजियस स्टडीज मध्ये डॉक्ट्रेट मिळवून ते सद्या अमेरिकेतील ऍरिझोना स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये भारतीय धर्माचे अध्यापन करतात. (more…)

रीफिगरिंग गोवा – गोव्याची मार्क्सवादी मांडणी

By KAUSTUBH SOMNATH NAIK/कौस्तुभ सोमनाथ नाईक

मानव्यशास्त्रांतून गोव्याविषयी जे काही लिहिले आहे त्यात गोव्याच्या इतिहासाची तसेच समाजजीवनातील क्लिष्टता व विरोधाभास ह्या दोन गोष्टी ठळक आढळून येतात. आणि हि मांडणी काहीश्या सोप्या पद्धतीने समजायची असेल तर ज्या संकल्पनांवर हि मांडणी आधारलेली आहे त्यांचाही थोडाफार परिचय करून देणे गरजेचे आहे. गोव्याविषयी, त्याच्या सामाजिक, ऐतिहासिक, राजकीय जीवनाविषयी समजायचं झालं तर कुठलाही एक पुस्तक ठोस सांगता येणार नाही. अनेक मांडणीतून इथले विरोधाभास आणि क्लिष्टता समजून घ्यावी लागते. म्हणूनच ह्या सदराची सुरुवात कुठून करावी हा जरासा अवघड प्रश्न होता. पण त्यातल्या त्यात एक पुस्तक कुठलं असेल तर ते डॉ. रघु त्रिचूर ह्यांचं ‘रीफिगरिंग गोवा’ हे २०१३ साली प्रकाशित झालेलं पुस्तक. अमेरिकेतल्या टेम्पल विद्यापीठात त्यांनी अँथ्रोपॉलॉजी शाखेत पीएचडी मिळवली असून हे पुस्तक त्यांनी लिहिलेल्या पीएचडी प्रबंधातून साकार झालं आहे. ते सद्या सॅक्रमेंटो येथील कॅलिफोर्निया स्टेट विद्यापीठात प्राध्यापक म्हणून रुजू आहेत. (more…)

पुरुषी नजर व स्त्री पुरुष समानता

कौस्तुभ नाईक/KAUSTUBH NAIK

 

डॉ लॉरा मल्वे ह्या ब्रिटिश प्राध्यापिकेने १९७५ साली ‘व्हिजुअल प्लेजर अँड नॅरेटिव्ह सिनेमा’ नावाचा एक निबंध ‘स्क्रीन’ ह्या नियतकालिकात प्रकाशित केला. ह्या निबंधात डॉ मल्वे ह्यांनी मनोविश्लेषणाचे सिद्धांत वापरून तत्कालीन हॉलिवूड सिनेमात स्त्रियांना चित्रित करण्याच्या प्रचलित पद्धतीवर भाष्य केले. सिनेमा हे माध्यम पुरुष दिग्दर्शकांनी पुरुष कॅमेरामन वापरून पुरुष प्रेक्षकांसाठी निर्माण केलेले असल्याने पडद्याबाहेर पुरुषांची स्त्रियांकडे पाहण्याची नजर त्यात परावर्तित होत असल्याचे मल्वे ह्यांनी सांगितले. त्यामुळे स्त्रियांना नेत्रसुखासाठी न्याहाळण्याचा सुप्त पुरुषी इच्छा पडद्यावर पूर्ण करण्यासाठी चित्रपटात स्त्रियांचा समावेश केला जातो असा शेरा त्यांनी मारला. ह्या सुप्त विलासी इच्छेला त्यांनी ‘मेल गेझ’ (पुरुषी नजर) असे नाव दिले. (more…)

Review: Avyahat

Courtesy: Vikram Phukan, The Theater Times.

The third generation of an almost 70-year-old Goa-based theatre company, the Hauns Sangeet Natya Mandal, has taken over the reins in recent years. In what is a cultural resurgence for the group, their new production, Avyahat, won top honors at the 58th Maharashtra State Amateur Marathi Theatre Competition in March. It will now be staged at the historically significant Mumbai Marathi Sahitya Sangh, as part of the Damu Kenkre Smriti Natyotsav, the five-day experimental theatre festival named for the noted Marathi stage director, who passed away in 2008. Avyahat is adapted from Amita Kanekar’s 2014 novel, A Spoke in The Wheel, by Kaustubh Naik and directed by his brother, Rohan Naik. The writer-director duo’s grandfather, the redoubtable Vishwanath Naik, founded the company in 1950. It continues to operate from the culturally rich city of Ponda in central Goa. (more…)

विष्णू वाघांच्या जाण्याचे काही संदर्भ

‘विष्णू मामा गेला’ हे फोनवर टाईप करताना क्षणातच अनंत युगांचं पोरकेपण नशिबी आल्याची जाणीव झाली. ह्या वाक्यात महत्वाचं आहे ते ‘गेला’ हे क्रियापद. त्याच्यामाझ्या सहवासातले ठळक टप्पे आठवण्याचा प्रयत्न केल्यास तो सतत कुठेतरी ‘गेलेलाच’ असल्याची जाणीव झाली. १९९४ मध्ये तो मगो सोडून काँग्रेसमध्ये गेला. तेव्हा मी तीन वर्षांचा होतो. ते त्याचं चुकलेलं पहिलं पाऊल असं मी लहानाचा मोठा होईपर्यंत ऐकत आलो आहे. तो ज्या दिवशी काँग्रेसमध्ये गेला त्या संध्याकाळी आमच्या घरी एक वादळी बैठक झाली. त्यात विष्णू मामाबरोबर वावरणारे, अगदी आदल्या रात्री व त्या दुपारपर्यंत त्याच्याबरोबर असणारे त्याचे सहकारी उपस्थित होते. तो काँग्रेसमध्ये गेलाच कसा ह्या प्रश्नावर माझे आजोबा विश्वनाथ नाईक ह्यांनी सगळ्यांनाच फैलावर घेतले. त्यातल्या बऱ्याच जणांना तो काँग्रेसमध्ये जाणार असल्याचा काहीच सुगावा नव्हता. (more…)

आंतोनियो कॉश्तांच्या माफीचे राजकारण

कौस्तुभ नाईक/KAUSTUBH NAIK

गोमंतकीय वंशाचे व पोर्तुगालचे सद्याचे पंतप्रधान आंतोनियो कॉश्ता हे गोवा भेटीवर असतानाचे निमित्त साधून साडेचारशे वर्षाच्या पोर्तुगीज राजवटीसाठी कॉश्ता ह्यांनी माफी मागावी अशी मागणी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे नेते सुदिन ढवळीकर ह्यांनी केली आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर आलेली ही मागणी आणि ढवळीकरांचे सनातनी हिंदुत्वप्रेम लक्षात घेतल्यास ह्या मागणीचा रोख नेमका कुठे आहे हे सुज्ञास सांगायची गरज नाही. पण अशा घोषणामागे गोव्याच्या वसाहतवादी इतिहासाचे एकसुरी चित्र रंगवून सामाजिक तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न अधोरेखित केले पाहिजे.

(more…)