हिंदू कॅथॉलिक एनकॉउंटर्स – गोव्यातल्या संकीर्ण धार्मिक जाणीवेचा शोध
By KAUSTUBH SOMNATH NAIK/कौस्तुभ सोमनाथ नाईक
२०१३ साली तत्कालीन मुख्यमंत्री स्व मनोहर पर्रीकर ह्यांनी एका मुलाखतीत ‘गोव्यातील कॅथॉलिक समाज हा सांस्कृतिकरीत्या हिंदू आहे‘ अश्या स्वरूपाचे काहीसे वादग्रस्त विधान केले होते. आजही अशाप्रकारची विधाने, खासकरून निवडणुकीच्या तोंडावर आपण ऐकत असतो. गोव्यातल्या मुस्लिम समाज इतर मुस्लिम समाजापेक्षा वेगळे आहे असेही म्हटले जाते. अशी विधाने वरवर ठीक वाटत असली तरी ती काही मूलभूत प्रश्न निर्माण करतात. मुळात हिंदू असणे म्हणजे काय, ख्रिश्चन (त्यातही कॅथॉलिक) असणे म्हणजे काय ह्याची व्याख्या कोणती? त्या व्याख्येची ऐतिहासिक प्रक्रिया काय? गोव्यात हिंदू किंवा कॅथॉलिक असण्याची ठळक वैशिष्ट्ये कोणती? ह्यातल्या सीमारेषा अगदीच स्पष्ट आहेत का पुसट आहेत? गोव्यातले कॅथॉलिक जसे सांस्कृतीकरित्या हिंदू भासतात तसेच गोव्यातल्या हिंदूंना सांस्कृतीकरित्या कॅथॉलिक म्हणू शकतो का? अश्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न डॉ. अलेक्झांडर हेन ह्यांनी आपल्या ‘हिंदू कॅथॉलिक एन्काऊंटर’ ह्या पुस्तकात केला आहे. जर्मनीतील हायडेलबर्ग विद्यापीठात रिलिजियस स्टडीज मध्ये डॉक्ट्रेट मिळवून ते सद्या अमेरिकेतील ऍरिझोना स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये भारतीय धर्माचे अध्यापन करतात. (more…)